Home » मनोरंजन » पैशाबाबत 5 अशा गोष्टी बँक तुमच्यापासून लपवून ठेवते, वाचा सविस्तर माहिती

पैशाबाबत 5 अशा गोष्टी बँक तुमच्यापासून लपवून ठेवते, वाचा सविस्तर माहिती

Please follow and like us:

Bank Hidden Truth: पैशाबाबत 5 अशा गोष्टी बँक तुमच्यापासून लपवून ठेवते, वाचा सविस्तर माहिती

बँक! बँक म्हंटल कि आपल्या मनामध्ये प्रथम पैसा अशी प्रतिमा निर्माण होते. बँक आपल्या दैनंदिन जीवना मधला एक महत्वपूर्ण घटक बनला आहे. सगळ्यांना वाटते कि आपले पैसे सुरक्षित असायला हवेत. या जगात कोणीही असे नसेल कि त्याला आपले पैसे लपवायला आपल्या बेडच्या गादीखाली किंव्हा घराच्या पाठीमागच्या अंगणात ठेवावेसे वाटतात. तुम्ही लोन घ्या, पैसे खर्च करा किंव्हा पैसे बचत करा तुम्हाला कुठल्या न कुठल्या बँकेची नक्कीच गरज असणार. अशा खूप साऱ्या गोष्टी आहे जिथून बँक तुमच्याकडून पैसे कमवणार आहे.

पण तुम्हाला माहितीये का? एक गोष्ट अशी पण आहे जी प्रत्येक बँक तुमच्यापासून लपवून ठेवते. आज आपण अशाच काही ५ गोष्टी बघणार आहोत जे ऐकून तुमचे हि डोके गरगरल्या शिवाय राहणार नाही.

Bank Hidden Truth

1. प्रक्रिया शुल्क

आपणाला माहिती आहे बँक हि एक अशी जागा आहे जिथे आपला पैसा सुरक्षित असतो. पण बँक तुम्हाला हे सांगत नाही कि आपण प्रत्येक वर्षी पैसे गमावत आहात. जेंव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड किंव्हा डेबिट कार्ड मधून काही वस्तू मागवता किंव्हा ऑर्डर करता तेंव्हा इथे बँक प्रोसेसिंग फीस (प्रक्रिया शुल्क) म्हणून काही रक्कम तुमच्या बँकेतून वजा करत असते. दुसरी एक गोष्ट म्हणजे डेबिट कार्ड ला वर्षाला 200 तर क्रेडिट कार्ड ला 500 रुपये सर्विस टॅक्स बँकेकडून वसूल करण्यात येतो.

2. पैसे रोख म्हणून ठेवले जात नाहीत.

आपण जेवढे पैसे बँके मध्ये जमा करता ते पैसे बँक दुसऱ्या व्यक्तीला उधार म्हणून देत असते. बँक फ्रकॅशनल रिजर्व बँकिंग (Fractional Reserve Banking) मॉडेल वर काम करत असतात. ह्याला सोपं म्हंटल तर बँके मधला पूर्ण पैसे मुळात एक (कॅश इन हॅन्ड) आहे. समजा तुमच्या बँकेत १ लाख रुपये आहेत त्यातले फक्त १० टक्के बँकेचे दायित्व आहे आणि बाकीचे ९० टक्के पैसे बँक दुसऱ्या लोकांना लोन देण्यात किंव्हा पुन्हा गुंतवणूक करत असतात. आता तुम्ही म्हणाल कि आम्हाला आमचे पैसे रोज आमच्या खात्या मध्ये दिसतात. पण वास्तवात तो फक्त एक डिजिटल नंबर आहे. पण जेंव्हा सगळे बँक खातेदार त्यांचे पैसे एकाच वेळी काढतील तेंव्हा ती बँक आर्थिक दृष्ट्या कोसळून जाईल.

हे हि वाचा: Career Tips: कॉर्पोरेट जॉब्स मध्ये सक्सेस होयचंय?, मग ‘हे’ ५ स्किल्स असणं आवश्यक

3. आंतरराष्ट्रीय विनिमय शुल्क

जेंव्हा तुम्ही परदेशात जाता आणि तिथे क्रेडिट कार्ड वापरता तेंव्हा तुम्हाला तिथे काही अतिरिक्त पैसे चार्ज म्हणून द्यावे लागतात. जे हि पैसे तुम्ही परदेशात ATM मधून काढता तेंव्हा तिथे बँक तुमच्या कडून जास्त पैसे वसुलते. उदा. तुम्ही 10 हजार रुपये ATM मधून काढले तर तुम्हाला 500 रुपयांच्या आसपास पैसे सर्विस चार्ज म्हणून जास्त मोजावे लागतात. या उलट जेंव्हा तुमच्या बँकेत बाहेरून एखादा व्यवहार झालेला असेल तर तिथे व्यवहार फीस (Transaction Fees) म्हणून काही पैसे कापले जातात. परदेशात जाताना लक्षात घ्या कि तिथे जाताना International Bank ATM Card हि असते. जे तुम्ही बँकेला संपर्क करून मिळवू शकता.

4. बँक तुमच्यावर नजर ठेवते

बँक तुमच्या बँक खात्यावर नजर ठेवते. तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड किंव्हा क्रेडिट कार्ड सोबत काय करता हे तुमच्या बँकेला माहिती असते. जेंव्हा तुम्ही तुमच्या बचत खात्यात एका वर्षांमध्ये १० लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश जमा करता तेंव्हा बँक सरकार ला सांगते कि तुम्ही बँकेत १० लाख रुपये Cash Deposit केले आहेत आणि करंट अकाउंट मध्यें ५० लाख रुपये. तेंव्हा सरकार तुम्हाला विचारू शकते कि हा पैसे कुटून आला? तुम्ही टॅक्स भरला कि नाही? अशा सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात.

5. बँकेला कर्ज देण्यास आवडत नाही.

हि गोष्ट प्रत्येक बँक तुमच्या पासून लपवते पण हि गोष्ट खरी आहे. बँकेला हे RBI च्या दबावाखाली येऊन करावे लागते. हो! हि गोष्ट प्रत्येक बँकेला लागू होत नाही पण हो जास्त तरी बँकेत हि गोष्ट बघायला मिळाली आहे. आपण ह्या गोष्टींकडे लक्ष दिलेच असेल जेव्हा बँक वार्षिक निकाल जाहीर करते तेव्हा त्यांचे लक्ष जोखीम नसलेले उत्पनांकडे किती वाढ आहे याकडे असते.

0 Comments

No Comment.