Home » जॉब्स » Career Tips: भारतात शिका ह्या ५ परदेशी भाषा, मिळवा रग्गड पैसेवाले जॉब्स आणि करियरच्या संधी

Career Tips: भारतात शिका ह्या ५ परदेशी भाषा, मिळवा रग्गड पैसेवाले जॉब्स आणि करियरच्या संधी

Please follow and like us:

Career Tips: भारतात शिका ह्या ५ परदेशी भाषा, मिळवा रग्गड पैसेवाले जॉब्स आणि करियरच्या संधी

ग्लोबलायजेशन मुळे देशा देशातील अंतर कमी झाले आहे. विविध देश आपापसात मैत्रीचे तसेच व्यापारांचे संबंध प्रस्तापित करताना दिसून येत आहे. आणि यामुळेच एकादी परदेशी भाषा आत्मसात करण काळाची गरज बनताना दिसून येत आहे. तसेच या फॉरेन भाषा मध्ये उत्तम करियर सुद्धा घडवता येऊ शकत. अशी घडवण्याची नामी संधी सुद्धा आपल्याला आहे. भाषा हा विषय सध्या दुर्लक्षित आहे. फक्त पास होण्यापुरतेच मार्क्स मिळवले तर गरज भागून जाईल या मुळे या नवीन भाषा शिकण्यासंदर्भातील जाणीव आपल्या इथे इतकी दिसत नाहीये. परंतु ह्या परदेशी भाषा जर का शिकल्या तर तुम्ही तुमचे करियर जलद गतीने घडवू शकता.

जसे जसे आपल्या भारताचा परकीय चलनासोबत देवाणघेवाण वाढत चाललं आहे तसेच त्या भाषा वर ज्ञान असणाऱ्या व प्रभुत्व असेलल्या तरुणांची मल्टिनॅशनल कंपन्या मध्ये गरज भासत चालली आहे. आज आपण कोणत्या परदेशी भाषा शिकला तर तुमचा रिझ्युम वजनदार होईल आणि तुम्हाला करियर कसे घडवता येईल या विषयावर चर्चा करणार आहोत. आज आपण ५ अश्या परदेशी भाषा बद्दल माहिती घेणार आहोत ज्या मुळे तुम्हाला तुमच्या करियरच्या येणाऱ्या काळांमध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो.

Foreign Language To Learn In India Marathi

1. फ्रेंच भाषा ( French Language )

भारतात शिकण्यात आणि शिकवण्यात प्रसिद्ध भाषण पैकी हि एक भाषा आहे. ३० पेक्षा जास्त देशांची अधिकृत हि फ्रेंच भाषा आहे. जगभरात ३० कोटीहून अधिक लोक फ्रेंच भाषेचा उपलोग करतात. ‘फोर्ब्स’ च्या एका अहवालानुसार २०५० पर्यंत ७५ कोटीहून अधिक लॉग फ्रेंच भाषा बोलणारे असतील. भारतात काही शाळा आणि कॉलेज मध्ये फ्रेंच भाषा शिकवली जाते.

खूप साऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिका, युरोप व कॅनडा ला शिकायला जाण्याची पसंती असते. जर तुम्ही कॅनडा व फ्रान्स ला ला शिकायला जाणार असाल तर तिथे फ्रेंच हि अधिकृत भाषा आहे. जर का हि भाषा तुम्ही शिकला तर तुम्हाला एम्बएस्सी मध्ये जॉब मिळू शकतो. इम्पोर्ट एक्स्पोर्ट कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतो.

2. जर्मन भाषा ( German Language )

जर्मन भाषा हि भारतीयांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची प्रसिद्ध भाषा आहे. १८ कोटींच्या आसपास हि भाषा जगभरात बोलली जाते. युरोप मध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी हि एक भाषा आहे. भारतातील खूप साऱ्या युनिव्हर्सिटी मध्ये जर्मन हा विषय पर्यायी आहे.

जर्मनी हि युरोप मधली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जगभरातून हि क्रमांक ४ ची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. यामुळेच जर्मन भाषा शिक्षण हे गरजेचं आहे. जगातील ५ सर्वात जास्त निर्यात करणाऱ्या देशात जर्मनी हि येते. यामुळे हि भाषा जर का तुम्ही शिकली तर पैसा आणि संधी या गोष्टी भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल.

3. स्पॅनिश भाषा ( Spanish Language )

स्पॅनिश हि 20 देशांची अधिकृत भाषा आहे. हि भाषा स्पेन मध्ये बोलली जाते. सेंट्रल आणि साऊथ अमेरिकन देशांमध्ये देखील या भाषेचा वापर होताना दिसून येतो. जगभरातुन ६० कोटी लोक स्पॅनिश भाषा बोलतात.

आता स्पॅनिश भाषेची ग्रामर आणि शब्दसंग्रह हा इंग्लिश च्या जवळच जाणारा आहे. भारताचे लॅटिन अमेरिका देशां बरोबर संबंध वाढताना दिसून येत आहे. याचा तुम्ही स्पॅनिश भाषा शिकून चांगल्या पद्धतीने फायदा उचलू शकता. मधल्या काळात स्पॅनिश भाषा शिकायचे प्रमाण अधिकच वाढलं होतात त्याच कारण PPO आणि KPO जॉब्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. आणि स्पॅनिश भाषा शिकून जास्तीत जास्त मुलें, मुली जॉब्स मिळवत होते.

4. कोरियन भाषा ( Korean Language )

असं एकही घर तुम्हाला सापडणार नाही जिथे LG आणि Samsung चे प्रॉडक्ट्स नाहीये. दोन्हीं कोरियन
कंपनी आहे. कोरियन प्रॉडक्ट्स साठी इंडियन मार्केट सर्वात गरजेचं मार्केट आहे. OTT प्लॅटफॉर्म्स मुळे हि भाषा शिकण्याची क्रेझ अजूनच वाढली आहे. K-POP तर सगळ्यांनाच माहिती असेल.

पण आपल्या पूर्वेकडच्या देशांमध्ये कोरियन भाषेला शिकण्यासाठी इतकं महत्व दिल जात नाही. ते शिकवणारे क्लासेस देखील आपल्या इथे जास्त उपलब्ध नाहीयेत. पण क्रेझ आता वाढलेली आहे त्यामुळे हि भाषा शिकणाऱ्यांचं प्रमाण देखील वाढलं आहे.

हे हि वाचा – Make Money Online: 10 ऑनलाइन कोर्सेस करून तुम्ही घर बसल्याही पैसे कमवू शकता

5. जापानी भाषा ( Japanese Language )

आपल्या इथे बुलेट ट्रेन बद्दल च्या चर्चा सतत सुरु असतात. पण या बुलेट ट्रेन बनव्यासाठी आर्थिक मदद हि जपान ने आपल्याला केली आहे. जपान आणि भारत या दोघांची मैत्री दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते यांच्यातील व्यापार देखील वाढत चाललेला दिसतो. भारतात देखील २ हजारहून अधिक जपानी कंपन्या आहेत. जपानी लोकांना जपानी भाषेत संवाद साधलेला जास्त आवडतो त्यामुळे त्यांना चांगला दुभाषी कायम हवा असतो. याच ठिकाणी आपण चांगली संधी साधू शकतो.

जपानी भाषा नक्कीच शिकायला अवघड आहे पण प्रॅक्टिस करून नक्कीच आपण त्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. जपानी भाषा हि सर्वोच्च वेतन देणारी भाषा सुद्धा आहे. खूप साऱ्या विध्यार्थ्यांना रोबोटिक्स मध्ये आवड दिसतीये. मग जर का तुम्हाला रोबोटिक्स मध्ये कॅरियर करायचे असेल तर जपानी भाषा शिकल्याने नक्कीच तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकतात.

निश्कर्ष

कोणतीही परदेशी भाषा जर तुम्हाला शिकायची असेल तर ती का शिकायची आहे? याचे उत्तर तुम्हाला माहिती असायला हवे. परदेशात सेटल होण्यासाठी नक्की कुठल्या देशात जायचे आहे याचेही उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे. ध्येय ठरवूनच तुम्ही परदेशी भाषांच्या कोर्सेसाठी ऍडमिशन घ्यावे. परदेशी भाषा शिकण्यासाठी भारतात उत्तम इन्स्टिटयूट आहेत आणि प्रत्येक इन्स्टिटयूट च्या रेटिंग नुसार त्याची फीस वेग वेगळी असू शकते. कोणतीही एक परदेशी भाषा शिकण्यापूर्वी भविष्यात संधी काय आहेत आणि तुम्हाला आवड कशात आहे हे सुद्धा समजून घ्या.

0 Comments

No Comment.